मराठीकाविता मध्ये आपलं स्वागत आहे. दि. १.१.२०११ पासून marathikavita.org मध्ये 2306 कविता संपादित केल्या गेल्या. आता आपण प्रत्येक तासाला नवीन कवितांचा आनंद घेवू शकता.
Archive for the ‘विरह’ Category:
परत ये
भावनेसाठी नको, पण मन दुखावण्यासाठी तरी परत ये!
साथ देऊ नको, पुन्हा सोडून जाण्यासाठी तरी परत ये!
कुणा-कुणाला सांगू, तुझं सोडून जाण्याचं दुःख;
किमान जगात माझी, अब्रु राखण्यासाठी तरी परत ये!
थोडीतरी कर, माझ्या प्रेमाची किंमत तू;
कवडीमोल भासले तर, भीक घालण्यासाठी तरी परत ये!
तुझ्या आठवणींत झुरुन, मन माझे खाक झाले;
या नश्वर देहाला, आग देण्यासाठी तरी परत………
विरहात तूझ्या आठवणीचे
आठवणी राहील्या सोबतीला,
असा हा एकांगी प्रवास,
दाही दीशांतून दाटे,
तूझा उदासिन ध्यास……
असे दूर नेती,
तुझेच सारे भास,
मागे वळूनी पाहता,
कुणी ना आस पास…….
किति हाका मारु,
शापित सा-या वाटा,
एकदा वळूनी बघ,
बुडले ते गाव आता,
विरहात तूझ्या आठवणीचे,
हजार तीर झेलले,
किती सहू घाव वेडे,
लढून शरिर थकले..
२३/०१/२०११
रमेश म्हात्रे
तुझीच वाट पहात आहे…
तिथेच मी अजूनी आहे,
मन उदास माझे झाले,
तुझीच वाट पहात आहे…
हे जीवन म्हणजे आता,
कोंडमारा झाला आहे,
पाण्याबाहेरील माश्याप्रमाणे,
जगण्यासाठी तड्फ़ड चालू आहे…
आशा आहे लवकर येशील…
काळे ढग दूर करशील…
निराशलेल्या या मनावर..
आशेची तू ज्योत लावशील…
कवी——–> समीर जोशी…
तारीख——> २७/०३/२०१०
तू
तू
जीवनाच्या प्रवासात तासन – तास उभ राहून
एखाद्या स्त्रिची वाट पाहण्याची सवय तू मला लावलीस
आणि स्वत : मात्र नामानिराळी राहिलीस ……
सौंदर्याची स्तुती करायला ती ही कवितेतून
सवय तू मला लावलीस
आणि स्वत : मात्र एकही कविता कधी ही नाही लिहिलीस…………
मी होतो त्या पेक्ष्या सतत वेगळा
दिसण्याची वागण्याची सवय तू मला लावलीस
आणि स्वत : मात्र एक सर्व सामान्य गृहिणी झालीस ……….
तुझी प्रसिद्धी माझ्यावर लादून
मला प्रसिद्धी मिळविण्याची सवय लावलीस
आणि स्वत : मात्र काळ्या कुट्ठ अंधारात गडप झालीस …….
आयुष्यात सतत काहीतरी शोधत मिळवत
राहण्याची सवय तू मला लावलीस
आणि स्वत : मात्र सर्व कला गुणांचा त्याग करून बासलीस……….
माझ्यातील मला तुझ्यासाठी शोधण्याची
सवय तू मला लहानपणापासूनच लावलीस
आणि या अर्थशून्य जगात अर्थहीन जीवन जगण्यास मला एकट सोडून निगून गेलीस …….
कवी
निलेश बामणे
