मराठीकाविता मध्ये आपलं स्वागत आहे. दि. १.१.२०११ पासून marathikavita.org मध्ये 2307 कविता संपादित केल्या गेल्या. आता आपण प्रत्येक तासाला नवीन कवितांचा आनंद घेवू शकता.
Archive for the ‘प्रेम’ Category:
तुला कळेलच.
तू असशील तुझ्या जगात सुखी
इथे तुझ्या नावाचे श्वास घेतो मी
ओंजळीत समेटून अश्रू सारे
तुलाच त्याचे अर्घ्य देतो मी
तुला कळेलच, उशिरा का होईना
माझं प्रेम नव्हतं इतकं व्यवहारी
दिल्या-घेतल्याचा हिशोब ठेवलास
पण तू राहशील प्रेमाशिवाय भिकारी
कधी कधी उगाच वाटतं मला
काय पाहिलं होतं मी तुझ्यात
तुझ्या-माझ्या नात्याचं भविष्य
तेव्हापासूनच होतं तळ्यात-मळ्यात
इतकं सारं सोसून, पाहूनही
मी माझ्या नशिबावर थक्क आहे
दारं उघडी ठेवलीत मी हृदयाची
पुन्हा प्रेमात पडण्याचा मलाही हक्क आहे
कविता समजण्याकरीत नसतात…कवितेतील भावना समजायचे असतात- आशिष….
येशील का ? …..
येशील का ? ………………..
.
लावण्य.. माझे ,चित्त चोरत आहे
का ? तू असा दूर अंतरात राहे…..
नको राहू असा तू अंतरी दूर…
येई उचंबळ जीवा हूर हूर…..
मी मागते केवळ वेळ तूजला…..
दिवसाचा क्षण ही पूरे मजला…
येशील का..? माघारी शब्दाने माझ्या…
स्पर्श पाझारील माझा.., ओठी तुझ्या….
चारशील का..?घास प्रेमाचा मला…
रुसणार नाही हे वचन तुला…..
……………………………………………………………………..कविता लोहे….
…………………………………………………….२०-०२-२०११
प्रेम
प्रेम उमजून समजून जाणून करता आल असत
तर किती बर झाल असत ……….
निदान प्रेमासाठी प्राण देणाऱ्या प्रेमिकांच
अर्थहीन मरण टळल असत ……….
फक्त नजरेला नजर मिळाली म्हणून
प्रेम व्यक्त केल गेल नसत ………..
हृदय विनाकारण चुकीच्या हातात
खेळण्यासारख दिल गेल नसत ….
प्रेमाच्या नावाखाली बरचस चुकीच
बाजारात विकल गेल नसत ………..
प्रेमाला जिवापेक्षा जास्त महत्व
कधीच प्राप्त झाल नसत …………
प्रेमात आणि युद्धात सार क्षम्य असत
अस म्हंटल गेल नसत ……….
दोन्हीत मरणाच्या शक्यतेला गृहीत
कधीच धरल गेल नसत ………..
एखाद प्रेम न जाणणार प्रेमळ हृदय
प्रेमाचाच बळी ठरलं नसत ……….
प्रेमासाठीच प्रेम जगात या बदनाम
चुकुनही कधी ठरलं नसत ………….
कवी – निलेश बामणे
बेधुंद मी…..आज….
बेधुंद मी…..आज…. ………………………..
वा-यासंगे झुलायचे आहे….
क्षणॊक्षणी फ़ुलायचे आहे….
साजरा वारा खट्याळ झाला….
पदरासंगे वाचाळ झाला…..
नभ ही आज फ़ितूर झाले…
बरसून मला त्रुप्त केले….
गोरे अंग मनसोक्त भिजे….
मलमली स्पर्श अंगी निजे…….
बेभान करी गंध गात्रीला….
अधीर होई बंध रात्रीला..
तिचा इशारा …A FLIRTING POEM
आज पुन्हा एकीने इशारा केला.,
लगेच मन मेरा पागल झाला.,
पुन्हा मी स्वप्न रंगवू लागलो.,
तिच्यासाठी POCKET MONEY जमवु लागलो.,
पण सगळ भंग पावल.,
तिला हे लगेच भ्रात्रूप्रेम भावल…
म्हणतात "हसली तर पटली ",,
आज दुसरीत माधुरी दिसली.,
दहाची COFFEE पिऊण ती हळूच लाजली.,
बिलाची पावती मात्र मीच फाडली.,
मनातच म्हंटल झाला सुरु प्रेमबंध.,
लगेच ती म्हणाली,"आता सगळ बंद "…..
तिसरीने मला खुप दिलासा दिला.,
मी माझ्या दुखांचा खुलासा केला.,
ती म्हणाली,वेडा कुठला,
नुसत्या हसण्या नि लाजन्यावर फ़िदा झाला''
तू खुपच सुंदर दिसतोस.,
पण कोणालाही फसतोस.,
YES! आता ही तरी पोरगी पटेल.,
रोज रोज बागेत भेटेल.,
इतक्यात तिचा तो आला.,
साला मला साला म्हणाला!!!!!!
आता 4तीला मी फसणार नाही.,
मनातले तिला कळणार नाही.,
पण तिनेच मला PRUPOSE केले.,
हळवे मन माझे लगेच पिघळले.,
गुलाब प्रेमाचे सुंदर फुलत होते.,
स्वप्नाना माझ्या पंख फुटत होते.,
आणि तिच्या बाबाना कलेपर्यंत सगले ठीक होते……
नंतर ५वि,६वि,७वि,….पोरींची काही कमी नाही.,
तरीही म्हणतो मित्रानो,आज प्रेमाची हमी नाही!!!!!!!!!!!!!!!!!!!!
__________________________________________UMAKANTह्रदयस्पर्शी
