मराठीकाविता मध्ये आपलं स्वागत आहे. दि. १.१.२०११ पासून marathikavita.org मध्ये 2309 कविता संपादित केल्या गेल्या. आता आपण प्रत्येक तासाला नवीन कवितांचा आनंद घेवू शकता.
Archive for the ‘मुक्त छंद’ Category:
मी अजूनी तिथेच पण हरवली प्रिती कूठे
वाट बघूनी तुझ्या परतीची,
अधिर झाली भाषा प्रितीचि,
जरी पुसून टाकली पापणी,
तरी स्वप्ने तूझीच लोचनी……
तूझ्या आठवणींचा परीमल,
माझ्या स्वप्नांच्या खंडरात फ़िरतो,
जाणून गुढ माझ्या एकांताचे,
मना भोवती निराधार बसतो…..
प्रितीचे आपूले सोनेरी क्षण आज हरवले,
नयनांना तू गेल्याचे दुखः खूप सळले,
तूजवाचूनी ते सा-यांनाच कळले,
मग मायेच्या प्रतिबिंबाला नशिब माझे हसले…..
त्या पहील्या भेटीच्या आठवतो खूणा,
वाळलेल्या फ़ुलात गंध शोधतो पुन्हा,
धुंद तेच चांदणे पण आज ती धूंदि कूठे,
मी अजूनी तिथेच पण हरवली प्रिती कूठे……..
०६/०२/२०११
रमेश म्हात्रे
भ्रष्ट
भ्रष्ट
जिथे दिसेल तिथे धावणारी जिथे मिळेल तिथे खाणारी
तू ही वाटलीस मला चार चौघीनसारखी काहीशी उथळ
म्हणून नकळत माझ्याही मनात विचार आला तुला एकदा भिडाव
हिमत केली एकदा आणि तुला भिडलो तेव्हा वाटलं तू माझीच वाट पाहत होतीस
जसा एकादा पारधी शिकारीची वाट पाहत असतो तसा
जसा मी तुला ओळखायला लागलो तस जाणवलं तू उथळ नाहीस
तू आहेस धीरगंभीर काहीशी शांत आणि पवित्र
पण आता मलाच स्वतःची लाज वाटू लागली होती कारण
माझ्या हातून पाप घडल होत तुझ पावित्र्य मी भ्रष्ट केल होत
आणि स्वतःच ही कदाचित ………
कवी
निलेश बामणे
आवर
आवर
माझ्यातील स्वैराचारास
कदाचित आवर घालायची ती
म्हणून नकोशी वाटायची
मला बंधने धर्माची
संस्कृती अन नैतिकतेची…
तुलना जेव्हा करतो मी
स्वताची इतरांशी
तेव्हा मलाच भीती वाटते
माझ्यातील नैतिकतेची…
धर्माने दिला मज दैववाद
संस्कृतीने दिला मज संस्कार
नैतिकतेने दिला मज परोपकार
काढून टाकता अंगरखा
धर्म संस्कृती अन नैतिकतेचा
पाहतो आरशात जेव्हा
दिसतो माझा मलाच मी
रुपात राक्षसाच्या…
आधुनिकतेचा पोशाख
चढविताच अंगावर
होतो स्वार्थी हव्यासी
अन मी लंपट…
वाहिले गाठोडे विचारांचे मी
माझ्या पूर्वजांनी दिलेल्या
तरच अर्थ प्राप्त होईल
कदाचित माझ्या जगण्याला…
पुरुष मी आहे घोड्या समान
त्याची लगाम दिली होती
देवाने स्त्रीच्या हाती
ती लगाम होती
धर्म संस्कृती अन नैतिकतेची
ती लगाम हातून सुटता स्त्रीच्या
माझ्यातील पुरुष आजही उधळतो
घोड्या समान
आणि मग शिकार ठरते स्त्रीच
माझ्यातील पुरशी अहंकार
आणि कधी – कधी वासनेची….
कवी – निलेश बामणे
नाहक
नाहक
जात – धर्माच्या नावावर आजही
बळी का जोतोय प्रेमाचा नाहक …
जात -
धर्म जपण्यासाठी आजचे
प्रियकर प्रेयसी का खातात माती नाहक …
आधुनिकतेचा
गाजावाजा करत आजचे सुसंस्कृत सभ्य पालकही
का कुरवाळत बसतात जात – धर्म नाहक
…
सुशिक्षित सुसंस्कृत आणि आधुनिक आजची पिढीही
का बळी ठरतेय जात – धर्माचा नाहक …
प्रेमात पडताना जात – धर्म आडवा येत नाही
मग तो लग्नाच्या वेळीच का आडवा येतो नाहक …
अजून कि वर्षे समानतेचा जयघोष
करत जात – धर्माच्या नावावर
प्रेमाचा बळी घेत राहणार आहोत आपण नाहक …
कवी
- निलेश बामणे
समर्थक
समर्थक
प्रेमाच्या दिवसाचा नाही
मी प्रेमाचा समर्थक आहे …..
प्रेमात लपलेल्या प्रचंड
ताकदीचा समर्थक आहे ……..
प्रेमाने जगात घडविलेल्या
क्रांतिचा समर्थक आहे ……..
प्रेमात लपलेल्या प्रेमळ
कवितांचा समर्थक आहे …….
प्रेमाने प्रेमिकांना दिलेल्या
ध्येयाचा समर्थक आहे ……..
प्रेमामुळे समाजात होणाऱ्या
बंडाचा समर्थक आहे …….
प्रेमासाठी बलिदान देणाऱ्या
प्रेमिकांचा समर्थक आहे ……….
प्रेमाला त्याग मानणाऱ्या
प्रत्येकाचा समर्थक आहे ………..
कवी – निलेश बामणे
Tags: प्रेम
