मराठीकाविता मध्ये आपलं स्वागत आहे. दि. १.१.२०११ पासून marathikavita.org मध्ये 2308 कविता संपादित केल्या गेल्या. आता आपण प्रत्येक तासाला नवीन कवितांचा आनंद घेवू शकता.
Archive for the ‘प्रेरणादायी’ Category:
आतूर
तुझे पाश लेण्यास आतूर आहे
निशेचा नशीला नवा नूर आहे
तृषा संपते ही तुझी ना कधीही
रिते होत जाण्यास मंजूर आहे
जरा धीर घे रे जरा श्वास घे रे
घडी मीलनाची जरा दूर आहे
असे मी तुझी खास नाही कुणाची
जरी गीत माझे, तुझा सूर आहे
नको त्रास देऊ तुझ्या लाडकीला
तुझे प्रेम नयनी जणू पूर आहे
….रसप….
०९ फेब्रुवारी २०११
कर्णाचे मनोगत
आज पुन्हा दानशूर म्हणून खपली निघाली,
रक्त नव्हे मनीचे अश्रू वाही
कुंतीचे अजाणतेपण भोवले मला ,
राजपुत्र असून, सूतपुत्र ,म्हणून सतत हिणवले मला,
मैत्रीचा आधार नशिबी असे,
पण स्वयंवरा पासून इतर रोखिती मला ,
देवानेही काय चाल खेळली ,
ओळखून सुद्धा मी कवच वाहिली ,
माझा शब्द मला प्रिय असे ,
इतरांची आता फिकीर नसे,
परशुरामाने हि शापच दिला ,
मातेस शब्द दिला ५ पुत्रांचा ,
कृष्णा ने हि वेळ साधली ,
चक्र सोडून लढलो हि असतो ,
दुसरा रथ मागवू शकलो असतो ,
पण मातेस दिलेला शब्द आडवा येतो ,
आश्रय दिला त्याला साथ दिली ,
म्हणून नावें नशिबी आली,
साथ नाही दिली तरी ,
जाणीव नाही, असे माझ्या नशिबी ,
ज्येष्ठ पुत्र असून मान नाही ,
इतिहासानेही त्याची नोंद घेतली नाही ,
राज पाठ नको ,नको राज सत्ता ,
मला हवी होती फक्त जाहीर मान्यता,
काय बरोबर ,काय चूक ,वाटले इतिहास ठरवील ,
माझे शल्य,दुखः,कोणास कळले नाही ,
मी मात्र आशेने त्याची वाट पाही ,,,,,,,,,,,,,,,,
महेश
नजर
नजरेत तुझ्या विश्वास दिसतो,
जो माझा आत्मविश्वास बनतो,
नजरेत तुझ्या स्वप्न आहे,
जे माझे ध्येय आहे,
नजरेत तुझ्या शांतता असते,
तीच मनाला दिलासा देते,
नजरेत तुझ्या आनंद असतो,
तो क्षण मला सर्वांग-सुंदर भासतो.
नजरेतलं हसू जाणवताच,
मला नवं क्षितीज गवसतं,
म्हणूनच तू नसूनही तुझं असणं आहे ,
माझ्या अस्तित्वाच्या शिंपल्याच तू कोंदण आहेस.
माझी पहिली कविता ..-”नजर” – पल्लवी जाधव
नवीन वाटा नवे सोबती
नवीन वाटा नवे सोबती
विसरू सारे जुने कालचे
स्वप्न उद्याचे चला पाहूया
नवीन वाटा नवे सोबती
नव्या वळणावर जाऊ या
पराभवाला विसरू सारे
पुन्हा यशाचे वाहील वारे
डाव नव्याने मांडून पुन्हा
अचूकतेने लक्ष्य भेदू या
नवीन वाटा नवे सोबती
नवीन खेळी नव्या संगती
नव्या जगाची नवी पहाट
धवल यशाने रंगवू या ..
डॉ परमेश्वर
माझी कविता वाचताना……………..तू..
माझी कविता वाचताना……………..तू… ………
मी जिवन गीत असे लिहावे….
की तू वाचता क्षणोक्षणी जगावे….
…………………………………………………
……………………………………………………………………………
लिहिता मी , ही रात व्हावी नशीली…
वाचता ,शुष्क प्रिती व्हावी रशिली….
लिहिता मी , शब्द स्वरात विसावे….
वाचता तू , ओठी अलगद भिजावे…
लिहिता, शब्द भावनात गुंफ़ावे….
वाचता , तूझे ह्रुदय झंकारावे…..
लिहिता ,गंध सुटावा मदनाचा…
वाचता , बंध फ़ुटावा स्पंदनाचा….
लिहिता शब्द कणात पसरावे….
वाचाता, भाव रोमात बहरावे….
………………………………………..कविता लोहे…..
…………………………………………………१३-०२-२०११
