मराठीकाविता मध्ये आपलं स्वागत आहे. दि. १.१.२०११ पासून marathikavita.org मध्ये 2309 कविता संपादित केल्या गेल्या. आता आपण प्रत्येक तासाला नवीन कवितांचा आनंद घेवू शकता.
Author Archive
शुन्यता…
स्तब्धतेचा रात्रवेढा खेळ आहे चालला,
रेटण्याला अंत नाही जीव झाला कोसला.
का जुन्या रंगात अजुनी चित्र माझे रंगते,
ओस सारे कोस झालेनजर आता खंगते.
भग्नतेच्या किर्तनाची चालली ही देह दिंडी,
सुर थोडे कापलेले काळ जाच्या आर्त पिंडी.
पानगळी या संपलेली मोगर्याची अस्मिता,
हुंगण्याला राहीली ही जिवघेणी शुन्यता.
- शशांक प्रतापवार
नजर तूझी…..
नजर तूझी….. …………………..
ही नजर, कैद झाली ह्रुदयी माझ्या..
होऊनी वळीव लोचनात तूझ्या……
सोस ही वाढविती भुलविण्यासी
कशी भुरळ पड्ली नजरासी…..
रात चांदण्यात थबकत विरते..
नजर लोचनात कैद फ़िरते….
अवखळूनी पाहिलेस तू असे..
आता सारे जग ही वेल्हाळ दिसे…
हा भास ही नवथर होता आज…
गुंफ़ित तूजला लाजली लाज….
निखळले शब्द अलगद जरी…
समीटलेस मज नजरावरी…..
………………………………………….कविता लोहे….
पहिले प्रेम
मावळत्या सूर्या सवे उधळीत प्रेम बसली ती सांजवेळी
भारावलेल्या डोळ्यातील स्वप्ने घेउन माझ्याजवळी……
हात माझा हाती घेत ओघळले अश्रु तुझे
थेंम्बा थेंम्बात एकच नाव मलाच दिसले माझे…..
सांज विजुन रात झाली आली रात राणी
डोळ्यातील स्वप्नात जखडलो आम्ही दोघ आडाणी…..
घाबरलेल्या मनास माझ्या ठेविले प्रज्वलित श्वासांनी
होकार देत नजरेतुनी सावरले मलाच तिच्या आसवांनी…..
होता नवता विचार संपला जणू जिंकल जग सार
नजरेतुनी होकार मिळता चिंता पळाली पार…..
थरथरलेल्या मनातून पडला गळून शब्दांचा नकाब
तना मनाच्या व्याकुलतेला मिळाला प्रेमाचा जाब…..
जन्म मरणाच्या या फेरीला मिळाली नवी साथ
रात चांदण्यास देत साक्षी आयुष्यभराचा धरला हात…..
कमलेश प्रल्हाद गुंजाळ
तुझ्याविना या जगात…
तुझ्याविना या जगात माझा जगावयाला नकार आहे
तुझ्याच साठी जगायला का ! मरायला ही तयार आहे !
तुझ्याविना या जगात माझा जगावयाला नकार आहे
उत्पत्ती अन् स्थिती लयाचा – कलीयुगाचाच खेळ सारा
“अ” कार झाला – “उ” कार झाला – महेश्वराचा “म” कार आहे
खुणावुनी सांगतो कसा बघ ! मला नभातून शुक्र तारा
कुणी नसे सोबती तरी हा अढळ पणाचा विकार आहे
मनातुनी खोल साद येते – रडू नको रे ! – रडू नको रे !
कुणीच नाही इथे कुणाचा – तुझाच तू शिल्पकार आहे
तुला कधी सांग वेळ होता ? टिपून घेण्यास गीत माझे
सुन्या सुन्या मैफलीत माझ्या , मुकाच मी गीतकार आहे
गणीत कोणा कसे सुटावे ? उगाच यावे – उगाच जावे !
पुन्हा पुन्हा या जगी मराया तशी शिदोरी चिकार आहे
मयुरेश साने..दि..२३-फेब-११
पुन्हा गुलाब ताजा होतो
पहिल्या भेटीत तु दिलेला गुलाब
डायरीच्या आत तसाच आहे
मोरपिसी गंध देत स्पर्षात
जीवंत., ताजा माझ्या आठवात
रुजलेली पाऊलवाट हृदयातली
हळूवार क्षण गेलेल्या ऋतुतले
सारे काही मी जपून ठेवलेले
आणखी काही नाही ना उरलेले
बेचैनी मला बिलगुन असते
मनाचा पारा अलगद निसटतो
आकाशाला पण येते कणव
हा दिवस एका तपासारखा संपतो
पुन्हा गुलाब ताजा होतो
फ़ुल आनंदाने डोलु लागतं
खपली आठवावर धरली जाते
कुणीतरी देवळात दीप लावतं
कल्पी जोशी
१४/०२/२०११
