Welcome to marathityping.com. Now you can enjoy poems hourly. If you are poet do post your poems on this site.

मराठीकाविता मध्ये आपलं स्वागत आहे. दि. १.१.२०११ पासून marathikavita.org मध्ये 2321 कविता संपादित केल्या गेल्या. आता आपण प्रत्येक तासाला नवीन कवितांचा आनंद घेवू शकता.


"तुझा निसटता हातं.."

September 28th, 2015 Posted in कविता

तुझा निसटता हातं हातातून सरतं होता तेव्हाचं..

मनातं,
स्वप्नांचे महालं कोसळतं होते..

डोळ्यांत,
अश्रुंनी तुझी छ्बी धुसरं केली होती..

ह्रदयातं,
खोलवरं कुठेतरी पटले होते की..
"तु" अशीचं विरुनं जाणार आता प्रत्येक क्षणाला..

तुला त्याचे काहीचं कसे वाटंत नाही ?
चेह-यावर साधी एक दु:खाची झुळुकं पण नाही ? असा विचार आला..

शेवटी प्रेमाचा नुसता मुखवटाचं होता – "अस्तित्व शून्यं"..
खेळलीसं मनसोक्त माझ्या भाबड्या जिवाशी.. असा समजं झाला..

तरी तू गप्पचं.. एक टक माझ्याकडे लक्ष लावूनं..

थोडी नजरं बाजुला सरली आणि कसला तरी आवाज झाला..
तुला सावरायला पुढे झालो आणि स्वत: अजुनंही नाही सावरलो..

तो शेवटचाचं स्पर्श होता निसटता…. आणि
तु ही निसटलीसं या कर्म-कांडातूनं..

मी पुरुषंच शेवटी.. संशयी, दगडाचं काळिज घेऊन जगणारा.

तु मात्रं शब्द राखलासं – पहिल्या भेटीतल्या वाक्याने शेवटं केलासं..

"तुझी नाही झाले तर कुणाचीही नाही होणार या जन्मातं !".

Sameer_7th Jan 1:28 am