Welcome to marathityping.com. Now you can enjoy poems hourly. If you are poet do post your poems on this site.

मराठीकाविता मध्ये आपलं स्वागत आहे. दि. १.१.२०११ पासून marathikavita.org मध्ये 2321 कविता संपादित केल्या गेल्या. आता आपण प्रत्येक तासाला नवीन कवितांचा आनंद घेवू शकता.


भेट………तुझी-माझी

December 29th, 2014 Posted in कविता

हे दिवस सुद्धा मावळतील सागराच्या गर्भात सूर्याला लपवतील
तुझ्या आठवणीना माझ्या झोळीत टाकून बेधडकपणे पुढे निघून जातील
जेव्हा जेव्हा मी भेटले होते तुला,
पाहत रहाव तुझ्याकडे सारखं वाटायचं मला
पण खाली नजर झुकवून तू असायचास गप्पं
मग माझ मन म्हणे आपणही रहाव शांत
मला वाटायचं तू बोलावं तुला वाटायचं मी बोलावं
आपल्या बोलण्याची वाट बघत मग दिवसानेही ढळाव
संध्याकाळच्या छाया पसराव्यात दूरवर
झोंबणाऱ्या गारव्याने शहरे यावेत अंगावर
पाहत रहावस मग तू बुडणाऱ्या सूर्याकडे
आणि त्याच्याकडे पाहण्याचा बहाणा करीत मी तुझ्याकडे
कुठून करावी बोलायला सुरुवात या विचारात रहावं
विचार करता करता घरी परतण्याच्या त्या वेळेनी यावं
वळताना पाठीमागे मग व्हावा तुझा स्पर्श हलकेच मला
आणि काय सांगायचं होत तुला कळावं तिथच मला
इथवरच्या मूकभावना व्हाव्यात जणू बोलक्या
तू पसरावेत बाहू आणि मिठीत यावे मी तुझ्या हलक्या
अश्रुफुले निसटावेत नयनातून गालावरती
हळुवार मग तू फिरवावास हात त्यांच्यावरती
पावलावर पाऊल पडाव हळूच पुढे
हातामध्ये हात गुरफटावा घालीत पुढच्या भेटीचे साकडे….