मराठीकाविता मध्ये आपलं स्वागत आहे. दि. १.१.२०११ पासून marathikavita.org मध्ये 2306 कविता संपादित केल्या गेल्या. आता आपण प्रत्येक तासाला नवीन कवितांचा आनंद घेवू शकता.




लाज फ़ितूर….

February 20th, 2013 Posted in कविता, प्रेम

लाज फ़ितूर…….
दूर असूनी जवळी राहे.
स्मरता, श्वास लाजतो आहे….

चंदानस्पर्श ,तुझ्या ओठी ..
भाव फ़ुलता घोळते मिठी..

प्रितीत क्षणोक्षणी नाहाते…
लाज मनोमनी वाहते….

लोचनी यौवन श्रुंगारले….
स्पर्शता देह शाहारले….

रतीरंगीचा गंध आतूर..
लाज ही कुंपनाशी फ़ितूर ……

संवेदना गोड होता , देहाशी
वेचले स्पर्श बंधता मोहाशी……..

…………………………………………………….कविता लोहे….

……………………………………………………………………२४-०२-२०११