Welcome to marathityping.com. Now you can enjoy poems hourly. If you are poet do post your poems on this site.

मराठीकाविता मध्ये आपलं स्वागत आहे. दि. १.१.२०११ पासून marathikavita.org मध्ये 2321 कविता संपादित केल्या गेल्या. आता आपण प्रत्येक तासाला नवीन कवितांचा आनंद घेवू शकता.


रस्त्याचा आत्मसंवाद…

June 13th, 2018 No Comments   Posted in कविता

किती अनोळखी निराश पावलं
रोज निभावुन नेतात वेळ
शोधण्यासाठी… टाळण्यासाठी..
कोणाचे माध्यम होतो कधी
तर कोणाचा अबोल साथिदार..
माझ्या अस्तित्वाचे असंख्य फाटे
सदैव पहुडलेले असतात दुसर्‍यासाठीच..
पण रोजच्या तटस्थ गर्दीचा थंडपणा उदास करतो..
वाटत साला संपुन जाव एकदाच
पण कुठे जाता येत नाही..
मग दोन चार आवारा कुत्र्यांच्या साक्षीने
रात्रीच्या शांततेत करतो हा आत्मसंवाद
विस्तीर्ण एकांताला सहण करण्यासाठी..

– शशांक प्रतापवार


मी एकट्याने

September 29th, 2015 No Comments   Posted in कविता

सांयकाळी समुद्रकाठी फ़िरताना एक वृद्धानं एका

लहानग्याला किनार्‍यावर काहीतरी उचलून समुद्रात

फ़ेकताना पाहिलं. आश्चर्य वाटून तो त्याच्या जवळ

गेला तर तो समुद्राकाठचे तडफ़डणारे तारामासे एक-

एक करुन पुन्हा समुद्राच्या पाण्यात फ़ेकत होता.न

राहावून त्यानं लहानग्याला विचारलं, ;समुद्रकिनारी

इतके हजारो मासे आहेत, तु कुणा कुणाला वाचवू

शकणार आहेस??.. मुठभर मासे वाचवून जगाला

असा काय फ़रक पडणार आहे?त्या मुलाने आणखी

एक मासा समुद्रात फ़ेकत निरागसपणे उत्तर दिलं,

यानं जगाला काय फ़रक पडेल ते माहीत नाही. पण

या माशाला विचारा, त्याला काय फ़रक पडला? ज्याचा

मी नुकताच जीव वाचवला.

मी एकट्याने, मराठी माणसाकडुन खरेदी केल्याने

किती मराठी शेतकर्यांचे जिव वाचणार आहेत?

मी एकट्याने, मॊल्स मधुन खरेदी न केल्याने किती

मराठी व्यापार्यांचे जिव वाचणार आहेत?

मी एकट्याने, मराठी माणसाच्या पेट्रोल पंपावर, पेट्रोल

घेतल्याने किती मराठी जनतेवर सुपरिणाम होणार?

मी एकट्याने, डान्स बार मधे पैसे न ऊडविल्याने,

किती मराठी माणसे श्रीमंत होणार?

मी एकट्याने, मराठी माणसा कडुन फ़्लॆट / जमीन

विकत घेतल्याने किती मराठी

बिल्डर / कॊन्ट्रॆक्टरांची भरभराट होइल?

मी एकट्याने, विज वाचवल्याने किती अंधारलेल्या

घरांमधे प्रकाश पडेल?

मी एकट्याने, पाणी बचत केल्याने किती, तहानलेल्या

जिवांना पाणी मिळेल?

मी एकट्याने, मराठी किराणा दुकानदाराकडुन, किराणा

खरेदी केल्याने, किती मराठी दुकानदार [जिवघेण्या]

स्पर्धेत टिकुन रहातील?

मी एकट्याने, मराठी मालकाच्या हॊटेल मधुन खरेदी

केल्याने, किती मराठी हॊटेल मालकांना याचा फ़ायदा

होणार?

मी एकट्याने, मराठी माणसाचा पेपर वाचल्याने किती

मराठी पेपरमालकांचा धंदा वाढणार आहे?

उत्पादन किंवा सेवा कोणालाही विकावे , खरेदी, फ़क्त आणि फ़क्त मराठी शेतकर्याकडूनच / व्यापार्याकडूनच करावी.

महाराष्ट्रात बाहेरचे कोट्याधिश आणि अब्जाधिश आहेत याची लाज वाटू द्यावी. कितीही अड़चणी / प्रलोभने असली तरी मराठी माणसालाच मोठे करावे.

सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील त्याचे परन्तु तेथे अधिष्ठाण देवाचे पाहिजे.


सांज सकाळी

September 29th, 2015 No Comments   Posted in कविता

सांज सकाळी कातरवेळी……….

येतात नेहमी तुझ्याच आठवणी

आठवणी त्या मन करतात उदास…………………

तेव्हा खरच हवा असतो हळवा स्पर्श तुझाच ……………

मनीषा ७/११/२०१०


love

September 29th, 2015 No Comments   Posted in कविता

प्रेम
जे कोमल हृदयात निर्माण होऊन
हळुवार ओठावर येत ……….
पण तरीही ओठांनी न सांगता
डोळ्यांनी सांगितलं जात ………..
अस प्रेम कोणाजवळ व्यक्त करायला
एक दिवसच काय …….
आयुष्य ही आपल अपूर पडत
कधी कधी सार……….
तेव्हा तेच तर मला कळलेल
खर प्रेम नसत ………
कवी
निलेश बामणे first | < previous | next > | last


रंगकाम

September 29th, 2015 No Comments   Posted in कविता

ओल्या भिंतीवरच्या पापुद्र्यांसारखे

जेव्हा आतल्या दु:खाचे थर दिसू लागतात,

तेव्हा मनातल्या भिंतींचे रंगकाम काढावेच लागते.

भेगा कधीच भरता येत नाहीत,

लांबी लावून लपवता मात्र येतात.

खाचखळगे सलग करून, थोडी लिपापोती करून, उजळवता येते भिंत

दुखावलेल्या मनाचेही तसंच असतं

यार-मित्र काम चोख बजावतात लांबीचं

निदान पुढच्या ओलाव्या पर्यंत तरी मन खंबीर करतात भिंतीचं

मातीच्या असल्या तरी भिंती माणसापेक्षा शहाण्या असतात

म्हणूनच ओलाव्याला घाबरतात.

मन मात्र वेडं पाखरु, ओलाव्याची आस घेउन

धावत राहतं उगाचंच,

मग पापुद्रे निघणारंच, भेगा पडणारंच.

असो. घरातल्या भिंतींचं रंगकाम काढतोय, आता दिवाळी आली आहे.

माझ्या मना चल उठ, तूला देखिल रंगवायची वेळ आली आहे.

Salil